तंबाखू, सिगारेट विरोधात मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पुणे - शहरातील शाळा-महाविद्यालयांचे परिसर किंवा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या किंवा तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला आहे. ‘सिगारेट्‌स तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायद्या’अंतर्गत (कोटपा) ही कारवाई करणार आहे.

डॉ. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, कर्करोग तज्ज्ञ डॉ. अंकित शहा, डॉ. सुहासिनी घाणेकर,  निमेश सुमती, दीपक छिब्बा, देविदास शिंदे यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले.

डॉ. शहा म्हणाले, ‘‘सर्व प्रकारच्या कर्करोगापैकी ५० टक्के कर्करोग व ९० टक्के तोंडाचा कर्करोग हा तंबाखू सेवनामुळे होतो. अशा कर्करोगाच्या शस्त्रक्रिया झालेले ५० टक्के रुग्ण जास्त काळ जगू शकत नाहीत. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात सिगारेट, तंबाखू विक्रीस आळा घालणे महत्त्वाचे आहे.’’ 

लहान मुले, तरुण हे सिगारेट, तंबाखू, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनांच्या संपर्कात येणे धोकादायक आहे. हे रोखण्यासाठीच पोलिसांना प्रशिक्षण दिले असल्याचे डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले.

Web Title: Tobacco Cigarette Oppose Campaign