esakal | पुणे शहरात आज १८४ केंद्रांवर लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

पुणे शहरात आज १८४ केंद्रांवर लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शासनाकडून महापालिकेला (Municipal) २० हजार कोव्हीशील्ड लसीचे (Covishield Vaccine) डोस (Dose) उपलब्ध झाले असून, ६ हजार डोस शिल्लक आहे. त्याद्वारे १८४ केंद्रांवर आज लसीकरण (Vaccination) केले जाणार आहे. तर ६ केंद्रांवर कोव्हॅक्सीनची (Covaxin) लस उपलब्ध असेल. लसीसाठी ऑनलाइन बुकिंग सकाळी ८ वाजता सुरू होईल. दरम्यान, रविवारी (ता. १८) शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद असतील, असे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. (Today 184 Centers Vaccination in Pune City)

कोव्हीशील्ड

- पहिल्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

- पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (२३ एप्रिल) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस ऑनलाइन

- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी २० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

हेही वाचा: रवींद्र बऱ्हाटेने वापरलेली वाहने, मोबाईल पोलिसांनी केली जप्त

कोव्हॅक्सीन

- ६ केंद्रांवर प्रत्येकी ३०० डोस

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

- १८ जून पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

loading image