युतीचा निकाल आज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

पिंपरी - शिवसेना-भाजप युतीबाबत प्राथमिक बोलणी यशस्वी झाली आहे. जागावाटपाची पुढील बोलणी करण्यासाठी शुक्रवारी (ता. १३) पुन्हा युतीची बैठक होणार असून, त्या वेळी शिक्कामोर्तब होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी युती करायची की नाही, यासाठी दोनच दिवसांपूर्वी शहरातील युतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत कोणी किती जागा लढवायच्या याबाबत निर्णय झाला नाही; मात्र ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार प्रबळ असेल ती जागा शिवसेनेला, तर ज्या ठिकाणी भाजप उमेदवार प्रबळ असेल ती जागा भाजपला देण्याबाबतचा निर्णय झाला. पुढील बोलणी करण्यासाठी शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन केले आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. महापालिकेत सत्ता परिवर्तन घडवायचे असेल, तर युती करणे आवश्‍यक असल्याचे दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे; मात्र कोणी किती जागा लढवायच्या याबाबत मतभेद आहेत. भाजपच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन वर्षांत होणाऱ्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली असल्याने आम्हाला जादा जागा हव्या आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेनेही बरोबरीत जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. आमच्याकडे नागरिकांनी निवडून दिलेले दोन खासदार व एक आमदार आहे. तसेच गेल्या निवडणुकीत आमचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते युतीकडे डोळे लावून बसले आहेत; मात्र दोन्ही पक्षांनी ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी मुलाखती घेतल्या असून, युती न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. दोन दिवसांत युतीची बोलणी यशस्वी झाली नाही, तर युतीचा नाद सोडून देऊ, असा सूचक इशाराही शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला दिला आहे.

आघाडीबाबत दोन दिवसांत निर्णय
एकीकडे युतीची बोलणी सुरू झाली असली, तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अद्याप बोलणीच झालेली नाही. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे हे बाहेरगावी गेले असून, ते आल्यावर पुढील बोलणी होतील, असे राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले आहे. काँग्रेसशिवाय स्वाभिमान रिपब्लिकन, कष्टकरी कामगार पंचायत, समाजवादी पार्टी यांच्यासोबतही आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

Web Title: today alliance result