बच्चे कंपनीसाठी आज ‘वन डे फन डे’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी ‘सकाळ’तर्फे सोमवारी (ता. १) अफलातून ‘वन डे फन डे’ आयोजित केला आहे. मुलामुलींसह पालकांना विविध उपक्रमांची आणि खेळांची भन्नाट मेजवानी देणारा हा उपक्रम म्हात्रे पूल परिसरातील कृष्ण सुंदर गार्डन येथे दुपारी ३ ते रात्री ९.३० या वेळेत होत आहे.

मनोरंजनातून शिक्षण देत मुलांच्या कल्पनाशक्तीला अधिक प्रभावी बनविणारे ‘एरोमॉडेलिंग’, ‘क्‍ले मॉडेलिंग’, ‘टेराकोटा हॅंगिंग शोपिस’ अशा कार्यशाळा, ‘आंबे खा’ स्पर्धा, विशेष फूड आणि ‘गेमिंग झोन’ आणि गुंगवून टाकणारे जादूचे प्रयोग हे, या ‘फन डे’चे वैशिष्ट्य आहे. कार्यशाळांमध्ये ६ वर्षांवरील सर्वांना सहभागी होता येणार आहे.

आंबाप्रेमींसाठी दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० या वेळेत ‘आंबे खा’ स्पर्धा होईल. ‘देसाई बंधू आंबेवाले’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. 

जितेंद्र रघुवीर यांचा ‘मॅजिक शो’ सायंकाळी ७ ते रात्री ८.३० या वेळेत होणार आहे. उपक्रमासाठी प्रत्येकी रु. ५० प्रवेश शुल्क आहे. कार्यशाळा आणि ‘आंबे खा’ स्पर्धेसाठी वेगळे शुल्क आहे, तर ‘मॅजिक शो’साठी स्वतंत्र प्रवेश शुल्क नाही.  

अधिक माहिती
(वेळ दु. ३ ते ५) 
क्‍ले आर्ट : वयोगट १२ वर्षांपुढील शुल्क २०० रू. 
टेराकोटा हॅंगिंग शोपिस : वयोगट ६ वर्षांपुढील शुल्क २०० रू. 
एरोमॉडेलिंग : वयोगट ९ वर्षांपुढील शुल्क ४०० रू. 
‘आंबे खा’ स्पर्धा : वेळ दु. ४ ते सायं. ६.३० : वयोगट ५ ते ८ वर्षे, शुल्क ५० रू. 

‘वन डे फन डे’
कधी- सोमवार, १ मे २०१७  कोठे- कृष्ण सुंदर गार्डन, म्हात्रे पूल परिसर, एरंडवणे 
वेळ : दु.३ ते रात्री ९.३० 
नोंदणी : कृष्ण सुंदर गार्डन, (दुपारी २ वाजल्यापासून)

Web Title: Today for the child company One Day Fun Day