वाघोलीत कचरा प्रश्नावर आज बैठक संपन्न

Today the meeting concludes in vagholi on garbage issue
Today the meeting concludes in vagholi on garbage issue

वाघोली - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अजून एक प्रकल्प भाडेतत्वावर घेण्यात येणार असून तो जागा मिळाल्यानंतर आठवडेभरात कार्यान्वित होईल. दरम्यान दोन दिवसात घंटा गाड्या सुरू करण्यात येणार असून तो कचरा सध्याच्या डेपो जवळ टाकला जाणार आहे. सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती वाघोलीचे उपसरपंच संदीप सातव यांनी दिली. या बैठकीसाठी 17 पैकी 15 सदस्य उपस्थित होते.
                               
मागील महिनाभरापासून कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रकल्पाचे काम सुरू असल्याने डेपोच्या जागेत कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने कचरा उचलला जात नाही. घंटा गाड्याही बंद आहेत. त्यामुळे घरात कचरा अन दारात ही कचरा अशी परिस्थिती आहे. कचरा प्रश्नावर आज सदस्यांची बैठक झाली. त्यामध्ये भाडेतत्वावर अजून एक प्रकल्प कार्यान्वित करणे, घंटा गाड्या सुरू करणे, आजूबाजूच्या गावातील नागरिक, हॉटेल चालक कचरा आणून टाकतात त्यांच्यावर कारवाई करणे, भाडेतत्वावर घेतलेला कचरा प्रकल्प यशवी झाल्यास प्रत्येक वॉर्डात हा प्रकल्प कार्यान्वित करणे असे निर्णय घेण्यात आले. कचरा प्रश्नावर आयोजित दोन बैठकीसाठी नऊ सदस्यांनी दांडी मारल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शुक्रवारी तहकूब झालेली सभा सोमवारी झाली. वैयक्तिक कारणामुळे दोन सदस्य वगळता सर्वांनी उपस्थिती लावली.

समितीची स्थापना 
कचरा व ड्रेनेजच्या समस्या सोडविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सरपंच, उपसरपंच यासह प्रत्येक एका वॉर्डातील सदस्याचा समावेश करण्यात आला आहे. कचरा प्रकल्पासाठी योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी त्याक्षेत्रातील तज्ञाची मदत घेण्यात येणार आहे. 

सक्त कारवाई करणार
दुसऱ्या गावातील नागरिक व हॉटेल चालक वाघोलीत कचरा आणून टाकतात. त्यांच्यावर नजर ठेवून कचरा टाकणार्यावर सक्त कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com