प्रवेश न मिळालेल्यांना आज ऑनलाइन प्रवेश

प्रवेश न मिळालेल्यांना आज ऑनलाइन प्रवेश

पुणे - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या, यादीत नंबर लागूनही प्रवेश न घेणाऱ्या अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, या फेरीत संधी मिळणार आहे. या फेरीत आतापर्यंत तीन हजार ५०४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. प्रवेश न मिळालेल्या आणि ३५ ते १०० टक्के असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता. ३१) होणाऱ्या फेरीत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्‍चित करता येणार आहे.

केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत अकरावी प्रवेशासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी’ तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. त्यातील तिसऱ्या टप्प्यातील प्रवेशप्रक्रियेत शुक्रवारी विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. या फेरीतील पहिल्या टप्प्यात (८० ते १०० टक्के असणारे) ७३६ विद्यार्थी, तर, दुसऱ्या टप्प्यात (६० ते १०० टक्के असणारे) दोन हजार ३८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ७९४, तर दुसऱ्या टप्प्यात दोन हजार ७१० जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com