चंद्रकांत पाटलांनी विजयानंतर लगेचच पुणे सोडलं अन्...

Today s Planning of MLA Chandrakant Patil
Today s Planning of MLA Chandrakant Patil

कोथरूड (पुणे) : कोथरूडकरांनी निवडून दिल्यानंतर नवे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी (ता. 24) सायंकाळी छोटेखानी विजयोत्सव साजरा करीत, मतदारांचे आभार मानले. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मिळालेल्या मतांची आकडेवारी जाणून घेतली. त्यानंतर ते रात्री मुंबईला रवाना झाले.

दरम्यान, पाटील शनिवारी सकाळी पुण्यात येणार असून, कोथरूडसह शहरातील प्रश्नांबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून पाटील हे 1 लाख 5 हजार मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी मनसेचे किशोर शिंदेंचा 25 हजार मतांनी पराभव केला. या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, पाटील यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही, त्यावरून पक्षात नाराजी आहे. तर, दुसरीकडे त्याबाबतची कारणमीमांसाही सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com