पुणे 'ट्रॅक'वर; शाळा भरल्या, पुणेकर कामावर रुजू

ब्रिजमोहन पाटील
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी दिल्ल्यानंतर आज शैक्षणिक संस्था गजबजल्या. तरीही शहरातील वाहतूकीवर परिणाम झालेला नसून, वाहतूक सुरळीत सुरू आहे. 
 

पुणे : पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी दिल्ल्यानंतर आज शैक्षणिक संस्था गजबजल्या. तरीही शहरातील वाहतूकीवर परिणाम झालेला नसून, वाहतूक सुरळीत सुरू आहे. 

नदी अद्याप काठोकाठ भरून वाहत असल्याने बाबा भिडे पुल, जयवंतराव टिळक पुलावरील वाहतूक बंद असली तरी त्याचा परिणाम आज झालेला नाही. पुणेकरांनी मध्यवस्तीत व बाजारपेठत येण्याचे टाळले त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक साधारण आहे. सकाळपासून पावसाचे विश्रांती घेतल्याने रस्ते कोरडे झाल्याने वाहनांचा वेग वाढला. 

दुपारी बाराच्या सुमारास सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, पण अर्धा पाऊन तासात शाळांच्या परिसरातील ही वाहतूक सामान्य झाली. सायंकाळी सरकारी कार्यालय सुटल्यावर तसेच शाळा सुटल्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today Traffic is smooth in Pune