पुण्यात आजपासून यिन फेस्ट

पुण्यात आजपासून यिन फेस्ट

पुणे - ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ने (यिन) आयोजित केलेल्या ‘यिन फेस्ट’मध्ये डिझाइन क्षेत्राविषयी तरुणाईशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाच्या शृंखलेंतर्गत शुक्रवारी (ता. ३१) सकाळी कर्वेनगरमधील डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेन येथे होणाऱ्या संवाद सत्रात डिझाइन तज्ज्ञ करिश्‍मा शहानी  खान आणि नरेंद्र घाटे सहभागी होत आहेत.

संगीत, चित्रकला, गप्पा अन्‌ वैविध्यपूर्ण कलांचा आविष्कार असलेल्या ‘यिन फेस्ट’ला गेल्या शनिवारी कोल्हापूर येथून सुरवात झाली. पुणे आणि कोल्हापूरव्यतिरिक्त नाशिक, मुंबई, नागपूर आणि औरंगाबादमध्ये हा महोत्सव होत आहे.

डिझाइन क्षेत्रातील संधी आणि त्यातील बदलते प्रवाह या विषयावर डिझाइन क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांबरोबर ‘यिन टॉक’मध्ये गप्पा रंगणार आहेत.  

‘यिन’ने विद्यार्थ्यांसाठी डिझाइनसंदर्भात आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व नावीन्यपूर्ण आहे. डिझाइन म्हणजे रचना... प्रत्येक नवे डिझाइन नवा दृष्टिकोन देते. नवी उपयुक्तता व त्या वस्तूची, यंत्राची रचनात्मक उभारणीचा मार्ग सांगते. आणि त्यातून त्याच्या निर्मितीची एक निश्‍चित दिशा बनते. आयुष्याचं असंच काहीसे आहे असे मी मानतो. नियोजनपूर्ण व रचनात्मक यशस्वी आयुष्यात आर्थिक नियोजन आवश्‍यकच आहे. सजग गुंतवणूक या यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.  
- सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.

कार्यक्रमाचे स्थळ
स्थळ - म. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेन, कमिन्स कॉलेज रस्ता, कर्वेनगर
वेळ - सकाळी ११ वाजता
अधिक माहितीसाठी संपर्क - ९८८१५०४४९२ किंवा ९०७५००७९५८

प्रायोजक
संयुक्त प्रायोजक - सृजन कॉलेज ऑफ डिझाइन, पुणे
सहप्रायोजक - लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड


फॅशन डिझाइनमधील कल्पक करिश्‍मा शहानी खान 
करिश्‍मा शहानी खान यांनी लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून २०१० मध्ये पदवी घेतली. अभ्यासक्रमाचा भाग असणाऱ्या त्यांच्या ग्रॅज्युएशन कलेक्‍शनला त्या वर्षीचे सर्वोत्तम टेक्‍स्टाइल कलेक्‍शन ॲवॉर्ड मिळाले होते. 
कला रक्षाच्या ज्यूडी फ्रेटर यांच्याबरोबर काम करताना त्यांनी भारतीय कला आणि संस्कृतीशी निगडित कल्पनांविषयी काम सुरू केले. त्या सध्या पुण्यातील का-शा वस्त्रप्रावरणांच्या क्रिएटिव्ह डायरेक्‍टर आहेत. 

सर्वांत मोठे डिझाइन हाउस बनविणारे नरेंद्र घाटे 
टाटा एलेक्‍झीच्या इंडस्ट्रिअल डिझाइन स्टुडिओला आशियातील सर्वांत मोठे डिझाइन हाउस बनवण्यामध्ये श्रेय स्टुडिओचे चिफ डिझायनर नरेंद्र घाटे यांच्याकडे जाते. भविष्यातील कारमधल्या विविध तांत्रिक व अन्य सुविधा रचना प्रकल्पांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. बर्लिन तसेच शांघायमध्ये झालेल्या कार एचएमआय परिषदांमध्ये आणि लंडनमध्ये झालेल्या ब्रॅंड टू ग्लोबल परिषदेसह जगभरात विविध परिषदांमध्ये ते सहभागी झाले होते. घाटे यांचा आयआयटी, सृष्टी स्कूल ऑफ डिझाइनसारख्या शैक्षणिक संस्थांच्या ज्युरी सदस्यांमध्ये समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com