
डोर्लेवाडीत नवागतांचे ढोल-लेझीमच्या तालात स्वागत
डोर्लेवाडी, ता. २० : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील प्राथमिक शाळेतील दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-लेझीमच्या तालात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
डोर्लेवाडी येथील प्राथमिक शाळेत चालू शैक्षणिक वर्षामधील (सन २०२२-२३) इयत्ता पहिलीत दाखलपात्र विद्यार्थी दाखल करण्यासाठी विद्यार्थी व पालक यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याचे उद्घाटन सरपंच पांडुरंग सलवदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख बाळकृष्ण खरात, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित वामन, उपाध्यक्षा साधना रणजित भोपळे, अमोल काळकुटे, कल्याण कालगावकर, महेंद्र भोपळे, स्नेहा साळे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय नाळे आदी उपस्थित होते.
यावेळी नवागत विद्यार्थ्यांची ढोल- लेझीमच्या तालात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. शालेय परिसराची सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांची शाळेची भीती कमी करण्यासाठी मनोरंजक विविध स्टॉलची मांडणी केली होती. शिक्षकांनी नवागत मुलांना हसत खेळत मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले. जालिंदर बालगुडे यांनी प्रास्ताविक, पोपट ढोबळे यांनी स्वागत; तर ठकसेन दोडमीसे, राजेश कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. नवनाथ गायकवाड यांनी आभार मानले. विविध स्टॉल उभारणी व सजावट जमेला मुल्ला, अनिता घनवट, कल्पना दोडमिसे, छाया गावडे, रोहिणी देवकाते, सुरेखा गोफणे यांनी केले.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..