टाकेवाडी ग्रामपंचायत सदस्यपदी अश्विनी चिखले बिनविरोध

टाकेवाडी ग्रामपंचायत सदस्यपदी अश्विनी चिखले बिनविरोध

अश्र्विनी चिखले यांची
सदस्यपदी निवड

महाळुंगे पडवळ, ता. ३ : टाकेवाडी (ता.आंबेगाव) येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत अश्विनी मच्छिंद्र चिखले यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी शोभा केळकर व सहायक म्हणून तलाठी नितीन माने यांनी काम पाहिले.
टाकेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र.१ मागास प्रवर्ग जागेसाठी राखीव असल्याने जागा रिक्त होती. या जागेवर प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया जाहीर केली. सरपंच संदीप शिंदे, उपसरपंच अनिल चिखले, पोलिस पाटील उल्हास चिखले, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती वायाळ, उपाध्यक्ष भरत वायाळ, लक्ष्मण वायाळ, शिवाजी शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अश्विनी चिखले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
---------------------------------------------------------------------
00615

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com