बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात गौणखनिजची लुट तरडोली, बाबुर्डी, लोणीभापकर परिसरातील चित्र; भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात गौणखनिजची लुट
तरडोली, बाबुर्डी, लोणीभापकर परिसरातील चित्र; भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याचा धोका
बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात गौणखनिजची लुट तरडोली, बाबुर्डी, लोणीभापकर परिसरातील चित्र; भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याचा धोका

बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात गौणखनिजची लुट तरडोली, बाबुर्डी, लोणीभापकर परिसरातील चित्र; भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याचा धोका

sakal_logo
By

मोरगाव, ता. ५ : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात तरडोली, बाबुर्डी, लोणीभापकर गावाच्या हद्दीतून नदीपात्र, कऱ्हेकाठची शेतजमीन आणि ओढ्यातून वाळूमाफियांकडून वाळू, माती, या गौणखनिजची लुट सुरू आहे. यामुळे सरकारचा महसूल बुडत आहे असून वाळूचा उपसा झालेल्या भागात भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याचा धोका आहे.

वास्तविक, सरकारने जिरायती भागात जलस्रोत बळकटीकरणासाठी वाळू लिलाव बंद केले आहेत. शिवाय पाण्याची पातळी टिकून राहण्यासाठी खुद्द संबंधित ग्रामपंचायतीनींच वाळूचा लिलाव करण्यात येऊ नये, असा ग्रामसभेचा ठराव केला आहे. एकीकडे वाळूचा लिलाव रोखून भविष्यकाळातील पाण्याची टंचाई दूर करण्याचा स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे, तर दुसरीकडे मोरगाव पट्ट्यातून काही वाळुमाफिया बाहेरील गुंडगिरी प्रवृत्तीच्या काही लोकांना हाताशी धरून पूरक ठिकाणे पाहून तेथून वाळूचा उपसा केला जात आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी महसूल विभाग व पोलिसांना माहिती दिली, तर थेट वाळूचोरांना शेतकऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक देण्याचा प्रकार होत असल्याची माहिती तरडोली, आंबी बुद्रूक येथील शेतकऱ्यांनी दिली. यापूर्वी वाळूची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि वाळूचोरी करणाऱ्यांचे शाब्दिक वादविवाद झाले आहेत. मात्र, याचे रूपांतर मोठ्या वादात होऊ शकते. त्यामुळे चोरी होताना दिसली, तरी शेतकरी सध्या तक्रार करण्यासाठी धजावत नसल्याची परिस्थिती आहे.
चांदगुडेवाडी गावाच्या हद्दीतही काही वाळुचोर मशिन आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करत होते. मात्र, यास महसुल व पोलिस विभागाचा वरदहस्त असल्याने कारवाईचा फटका संबंधितांना बसला नाही. मोठ्या प्रमाणात वाळुचोरी होत असून, देखील कारवाई मात्र नाममात्र का होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

रस्ते बंद केले, तरीही वाळुउपसा सुरूच
तरडोली वनविभागाच्या परिसरातून वाळूची चोरी होत आहे. मात्र, वाळूची चोरी आमच्या विभागाचा विषय नसल्याची माहिती मोरगावचे वनपाल अमोल पाचपुते यांनी दिली. मात्र, वनविभागाच्या क्षेत्रातून ही वाहतूक होत असून येथून येणारे सर्व रस्ते मशिनच्या साहाय्याने खोदून तरडोलीचे तलाठी शाम झोडगे यांनी बंद केले आहेत. तरीही येथील वाळुउपसा जोरात सुरू आहे.

मोरगाव मंडलच्या कार्यक्षेत्रात वाळुचोरी करताना कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल. माहिती देणारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.
-नीलकंठ मुळे, मंडल अधिकारी, मोरगाव

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top