दातखिळे कुटुंबास महावितरणची मदत

दातखिळे कुटुंबास महावितरणची मदत

आपटाळे, ता. ९ : दातखिळेवाडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी आदिनाथ सबाजी दातखिळे यांचा ९ सप्टेंबर २०२१ रोजी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर
दातखिळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. धालेवाडीतर्फे हवेली-सावरगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, जुन्नर तालुका युवा सेना युवा अधिकारी विकी पारखे यांच्या पाठपुराव्यामुळे दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला महावितरणकडून ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिली. त्याचा धनादेश पारखे यांच्या हस्ते दातखिळे यांच्या पत्नी शशिकला यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
शेतकरी मारुती नायकोडी यांच्या टोमॅटो बागेजवळ असलेल्या विजेच्या खांबावरील तार तुटून, बागेत पडल्याने तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू झाला होता. यावेळी शेतकरी आदिनाथ दातखिळे यांचा स्पर्श टोमॅटोच्या बागेच्या तारेला झाला. विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडल्याने घटनास्थळी रात्री ११ च्या सुमारास विकी पारखे व सहकाऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत पंचनामा करून घेतला व मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना २० हजार रुपयांची तातडीची मदत मिळवून दिली.
यानंतर गुलाब पारखे व विकी पारखे यांनी महावितरण कंपनीकडे सततचा पाठपुरावा करून पीडित कुटुंबीयांना ४ लाख रुपयाची मदत मंजूर करून घेतली. यामुळे काले, दातखिळेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


01174

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com