शिर्सुफळ सासोयटीवर शिरसाई सहकार पॅनेलची सत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिर्सुफळ सासोयटीवर शिरसाई सहकार पॅनेलची सत्ता
दौंड भाजपचा आज महावितरणवर मोर्चा

शिर्सुफळ सासोयटीवर शिरसाई सहकार पॅनेलची सत्ता

sakal_logo
By

शिर्सुफळ, ता. ४ ः बारामती तालुक्यातील शिर्सुफळ विविध कार्यकारी विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची झाली. यामध्ये श्री शिरसाई सहकार पॅनेलने सात जागा जिंकत बहुमत मिळवले तर श्री शिरसाईमाता जनसेवा पॅनेलने सहा जागा जिंकल्या.

शिर्सुफळ ही तालुक्यातील महत्त्वाची सोसायटी आहे. १२९० सभासदांपैकी १०९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यामध्ये शिरसाई सहकार पॅनेलचे तानाजी आटोळे, दीपक आटोळे, महादेव आटोळे, बापू दादाराम आटोळे, दत्तात्रेय ठोंबरे, नामदेव झगडे, गणपत आटोळे, तर श्री शिरसाईमाता जनसेवा पॅनेलचे तुकाराम आटोळे , बापूराव नानासो आटोळे, रामभाऊ गाढवे, शारदा सदाशिव आटोळे, संजीवनी मधुकर झगडे, गणेश सातपुते हे उमेदवार विजयी झाले.
बहुमत प्राप्त श्री शिरसाई सहकार पॅनेलने दीपक आटोळे, शिवाजी झगडे, अशोक भगत, अतुल हिवरकर, तानाजी बापू आटोळे, अॅड. राजकिरण शिंदे, तुषार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुमत मिळवले.
दरम्यान या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत पेक्षाही चुरस पाहायला मिळाली. निवडणूक केंद्रावर तसेच परिसरात दिवसभर गर्दी होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी काम पाहिले.

गुळूमकर यांचा पराभव जिव्हारी

श्री शिरसाई सहकार पॅनेलने सात जागा जिंकत बहुमत मिळवले असले तरी सर्वसाधारण गटातून नवनाथ गुळुमकर यांचा पराभव सर्वांचा जिव्हारी लागल्याचे दिसत होते.यामुळे गड आला पण सिंह गेला अशी स्थिती पाहायला मिळाली.
-