बारामतीत पन्नास टक्के मुलांचे लसीकरण

बारामतीत पन्नास टक्के मुलांचे लसीकरण

सोमेश्वरनगर, ता. ६ : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणात बारामती तालुक्याने आघाडी घेतली असून, पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे पन्नास टक्केपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. दररोज चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना लसीकरण केले जात आहे.
आरोग्य विभागाच्या यंत्रणेने थेट शाळा-महाविद्यालयांचे सहकार्य घेऊन मोहीम वेगवान केली आहे. बारामती तालुक्यात ५६ विद्यालये ८ महाविद्यालये असून त्यात एकूण २२ हजार लसीकरणाचे लाभार्थी आहेत. आजअखेर पन्नास टक्केपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरीत लसीकरणासाठी मात्र कंबर कसावी लागणार आहे. चार-पाच दिवसांनी ज्येष्ठ व आरोग्य कर्मचाऱ्यांचा बुस्टर डोस सुरू करावयाचा आहे.
मराठी माध्यमाची विद्यालये उत्साहाने सहभाग घेत आहेत. परंतु काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा मात्र अजूनही नकारघंटा वाजवत असल्याने आरोग्य विभागापुढे आव्हान निर्माण झाले आहे. एका महाविद्यालयाने तर लसीकरणाची वेळ ठरल्यावर आणि आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी पोचल्यावर त्यांना परत पाठविले. डेल्टा व ओमिक्रॉनचा वेग वाढल्याने आरोग्य विभागास वेळ नसताना अशा कृती घडत असल्याने ताणतणाव वाढणार आहेत. यामुळे शाळा-महाविद्यालयांनी तसेच शाळा व्यवस्थापन समित्या व गावपुढाऱ्यांनी यासाठी पुढाकार स्वतःहून पुढाकार घेणे गरजेचे आहे.

बावीस हजार लाभार्थींपैकी तेरा हजारांपेक्षा अधिकचे लसीकरण पूर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांकडे लसीकरणासाठी आधार कार्ड नसेल तरीही शाळेच्या पत्रावर लसीकरण करत आहोत. शाळा-महाविद्यालयांचे सहकार्य मिळाले तर दहा तारखेपर्यंत लसीकरण पूर्ण होईल. त्यानंतर ज्येष्ठ व फ्रंट वर्कर यांना बुस्टर डोस सुरू करत आहोत.
-डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी
---
01333

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com