विजेच्या धक्का बसून पिंपरीत म्हशीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या धक्का बसून पिंपरीत म्हशीचा मृत्यू
विजेच्या धक्का बसून पिंपरीत म्हशीचा मृत्यू

विजेच्या धक्का बसून पिंपरीत म्हशीचा मृत्यू

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता.४ : पिंपरी बुद्रुक (ता इंदापूर) येथे तुटलेल्या विद्युत तारेच्या प्रवाहाचा धक्का बसल्याने सोमवारी (ता.३) म्हशीचा मृत्यू झाला. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे
दादा नशीर शेख यांचे नुकसान झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
येथील दलित वस्तीतील रोहित्राला आलेल्या विद्युत तारेतील आर्थिंगची तार आठ दिवसांपूर्वी तुटून पडली होती. त्यामध्ये विद्युत प्रवाह सुरूच होता. शेख यांनी म्हैस चरण्यासाठी सोडली असता उघड्यावरच तुटून पडलेल्या तारेतील विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने ती जागीच मृत्युमुखी पडली. मागील दहा दिवसांपासून तुटलेली तार महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बसविली नसल्याने ही घटना घडल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. यामुळे संबंधित वायरमनवर महावितरण कारवाई करणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या म्हशीचा पंचनामा बावडा शाखाधिकारी युवराज जाधव यांनी जागेवर येऊन केला. यावेळी म्हशीच्या नुकसान भरपाई पोटी २५ हजार रुपये देण्याची मागणी शेख यांनी महावितरणकडे केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top