नारायणगाव सोसायटीत चुरशीची लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणगाव सोसायटीत चुरशीची लढत
नारायणगाव सोसायटीत चुरशीची लढत

नारायणगाव सोसायटीत चुरशीची लढत

sakal_logo
By

नारायणगाव, ता.४: नारायणगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बारा जागांसाठी
२४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सरपंच योगेश पाटे यांच्या नेतृत्वाखालील श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश वाजगे यांच्या नेतृत्वाखालील श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनेल यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. इतर मागासवर्गीय गटातून अरुण आबा कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पॅनेलच्या वतीने येथील ग्रामदैवत श्री मुक्ताई मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला. सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या परंपरेला या वेळी छेद मिळाला. नारायणगाव सोसायटीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात १९३९ साली झालेली आहे. सोसायटीचे २ हजार ५०३ सभासद असून १ हजार ९०० मतदार आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर काम पाहत आहे. १३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळात मतदान होणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top