केंद्राची इन्सेंटिव्ह योजना फायदेशीर ः नीरा नरसिंहपूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्राची इन्सेंटिव्ह योजना फायदेशीर ः नीरा नरसिंहपूर
केंद्राची इन्सेंटिव्ह योजना फायदेशीर ः नीरा नरसिंहपूर

केंद्राची इन्सेंटिव्ह योजना फायदेशीर ः नीरा नरसिंहपूर

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. ८ः केंद्र सरकारने डिस्टिलरी, इथेनॉल, रेक्टिफाईड स्पिरीट वाढीसाठी दोन लाख कोटी रुपयांची इन्सेंटिव्ह योजना जाहीर केली आहे. त्यातून कारखान्यांना प्रकल्प उभारणीसाठी सहा टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही योजना फायदेशीर असल्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
नीरा भीमा साखर कारखान्याच्या माध्यमातून राबवलेल्या परिवार संवाद अभियानात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी लालासाहेब पवार, विलास वाघमोडे, उदयसिंह पाटील, शीतल मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, गेल्या पन्नास वर्षात जे निर्णय झाले नाहीत ते केंद्र सरकार मधील पहिले सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतलेले आहेत. देशातील साखर कारखानदारीला लावलेला दहा हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आयकर विभागाने नीरा - भीमा कारखान्याला ८२ कोटीची, कर्मयोगी कारखान्याला १८७ कोटीची, छत्रपती कारखान्याला २०० कोटीची तर सहकार महर्षी कारखान्याला २५७ कोटींची नोटीस बजावली होती. यासंदर्भात सुप्रिम कोर्टातील लढ्यासाठी वकिलांना सोळा कोटी रुपये देऊनही न्याय मिळाला नाही, मात्र अमित शहा यांच्या माध्यमातून न्याय मिळाला.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top