राष्ट्रवादीच्या जिल्हा बँकेत प्रदीपकंदांसह भाजपाचाही चंचुप्रवेश..! माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घूलेंना धोबीपछाड....!!

राष्ट्रवादीच्या जिल्हा बँकेत प्रदीपकंदांसह भाजपाचाही चंचुप्रवेश..! माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घूलेंना धोबीपछाड....!!

प्रदीप कंद यांचा भाजपला उमेदवारीचा ‘मेसेज’
शिक्रापूर, ता. ४ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले व आता भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या आखाड्यात वावरणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पहिल्यांदाच सहकारात आपले नशीब अजमावले आणि पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक म्हणून ‘क’ वर्ग मतदार संघातून निवडून आले. सहकारात आतापर्यंत कधीच पाठ न लागलेले विद्यमान संचालक व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांचा त्यांनी १३ मतांनी पराभव केला. त्यामुळे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पात्र असल्याचा मेसेजही भाजपला दिला.
प्रदीप कंद हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणवले जायचे. त्याचाच प्रत्यय म्हणून त्यांना जिल्हा परिषदेत दोनदा उपाध्यक्ष व अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. मात्र, सन २०१४ व २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीसाठी डावलले गेले. त्यामुळे ते नाराज झाले व दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या मैत्रीच्या-मार्गाने थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटात सहभागी झाले. मात्र, सध्या जिल्ह्याच्या राजकारणात काहीच स्थान नसल्याचे दिसून येताच त्यांनी थेट जिल्हा बॅंकेच्या राजकारणात ‘क’ वर्गातून स्वत:ला झोकून दिले आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या ८३८ मतदारांपर्यंत स्वत:ला अगदी ताकदीने पोहचविले. एकूण ८३८ पैकी २६८ मते हवेलीतीलच आहेत. त्यांच्यासमोर सहकारातील एकूण ११ निवडणुकांमध्ये कधीच हार न मानलेले व राजकीय गुरुस्थानी असलेले घुले हे होते. या मतदारसंघात निवडणुकीपूर्वी तडजोडी करून बिनविरोध करण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, दोन्ही बाजूंचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने निवडणूक पार पडली व कंद थेट भाजपचे संचालक म्हणून जिल्हा बॅंकेत पोचले.
कंद यांनी सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यावेळी शिरूर-हवेली मतदारसंघातील तत्कालीन भाजपचे उमेदवार बाबूराव पाचर्णे यांचा ४१ हजारांनी पराभव झाला. त्यामुळे कंद यांचा भाजपमध्ये तोटाच झाल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्यासाठी जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रतिष्ठेची होती. त्यात त्यांनी बाजी मारली आणि राष्ट्रवादीसह थेट अजित पवार यांच्यावरच कुरघोडी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com