पाटील यांचा ग्रीन अवॉर्डने गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटील यांचा ग्रीन अवॉर्डने गौरव
आळंदीत सात दिवस कीर्तन महोत्सव

पाटील यांचा ग्रीन अवॉर्डने गौरव

sakal_logo
By

नसरापूर, ता. ३ : कोरोना काळात सन २०२० मध्ये जिल्हा मुख्यालयात कार्यरत असताना र्ई पाससाठी पारदर्शक व प्रामाणिकपणे उत्कृष्ट कामगिरी केलेल्या राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांचा टाँपटेन अधिकारी म्हणून ''ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड'' देऊन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पाटील सायबर यांनी गरजू व्यक्तींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई पास देण्यासाठी आदर्श यंत्रणा राबवत २४ तास ई पास देण्याचे काम पार पाडले. या बरोबरच पुणे ग्रामीण पोलिसांच्या वेबसाईट, पोर्टलवर व प्रसारमाध्यमांवर सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, स्थानिक फोन नंबर, ई पासाचा अर्ज भरून देण्यास मदत केली.
तसेच निकडीची गरज असलेल्या लोकांना त्वरित मदत करण्याचे पथदर्शक काम केले. यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला.
दरम्यान, कार्यक्रमात ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांनी निर्माण केलेल्या काळात पोलिस दलाने केलेल्या कार्याचा आढावा घेणाऱ्या समर्पण या चित्रफितीचे अनावरण डॉ अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्पार्क ग्रुपच्या सुनीता पाटसकर, कमलराज ग्रुपचे मोहन थोरात, साई मोतीवाले, कुमार अन्वेकर, अविनाश लगड, गौरव धूत आदी मान्यवर उपस्थित होते. दिगंबर ढोकळ यांनी सूत्रसंचालन केले.

02281

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top