
जांभळी सोसायटीच्या अध्यक्षपदी योगेश भिलारे
नसरापूर, ता. २९ : जांभळी (ता. भोर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी योगेश महादेव भिलारे, तर उपाध्यक्षपदी संतोष किसन अलगुडे यांची बिनविरोध निवड झाली.
जांभळी गावच्या ग्रामस्थांनी एकत्र येत सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेत यावेळी सर्व तरुणांकडे सोसायटीची सूत्रे दिली आहेत. सर्वानुमते ठरलेल्या बिनविरोध संचालकपदी प्रकाश रसाळ, बबन जाधव, दामोदर खुटवड, चंद्रकांत जाधव, रमेश सोनवणे, तुकाराम कोळपे, दिलीप मोहीते, अनिल तिखोळे, मंगल अलगुडे, सुशीला जाधव या संचालकांची निवड करण्यात आली. त्यानंतर झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी देखिल बिनविरोध निवड करत अध्यक्षपदी सर्वांत तरुण योगेश भिलारे व उपाध्यक्षपदी संतोष अलगुडे यांची निवड करण्यात आली.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जांभळीचे सरपंच अविनाश मादगुडे, उपसरपंच शिवाजी कोळपे, सोसायटीचे माजी अध्यक्ष विलास कोळपे, उपाध्यक्ष बबन खुटवड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल रसाळ, विनायक कोळपे, अजित कोळपे, दत्ता तिखोळे, अनिल भिलारे, सागर जाधव, सचिन अलगुडे, अविनाश आंबवले, तुषार कोळपे, सागर रसाळ, संदीप अलगुडे, सागर तिखोळे, बाबूतात्या कदम व राजेंद्र कोळपे यांनी प्रयत्न केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. आर. पवार व संस्थेचे सचिव अभिजित शेलार यांनी काम पाहिले.
योगेश भिलारे
संतोष अलगुडे
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..