दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

sakal_logo
By

आळंदी, ता. ४ : दरोड्याच्या तयारीतील मोशीतील पाच, खेडमधील एक, बीडचा एक, डुडुळगावचा एक, अशा आठ
तरुणांना; तर आळंदीतील एक तरुणीस आळंदी पोलिसांनी अटक केली.
याबाबत फिर्याद कैलास गर्जे यांनी दिली. त्यानुसार विलास दत्तात्रेय वाघमोडे, तेजस रवींद्र आल्हाट, वैभव बबन कांबळे, रोहित रामदास वाजे, विशाल केशवराव जाधव (सर्व रा. मोशी, ता. हवेली), सागर मोहन साबळे (वय ३४, रा. साबळेवाडी, ता. खेड), कलीम बादशाह शेख (वय २१, रा. माजलगाव, जि. बीड), ) येथील योगेश संजय हनुमंते (वय २६, रा. डुडुळगाव, ता. हवेली), तर आळंदीतील वडगाव रस्त्यावरील २४ वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले आहे.
आळंदी चाकण रस्त्यावर पहाटे तीनच्यावेळी हनुमाडीतील एका हॉटेलच्या आडोशाला अंधारात आरोपी उभे होते. आरोपींची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे नकली पिस्तूल, सहा मोबाईल, विना नंबरची दुचाकी, कोयता, लाल मिरची पावडर, नायलॉन दोरी, असा मिळून सुमारे दोन लाखांचा ऐवज आढळला.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top