थंडीचा उतार चढाव पिकांसाठी घातक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थंडीचा उतार चढाव पिकांसाठी घातक
थंडीचा उतार चढाव पिकांसाठी घातक

थंडीचा उतार चढाव पिकांसाठी घातक

sakal_logo
By

टाकळी हाजी, ता. ८ : शिरूर तालुक्यात रब्बी हंगामात सरासरी ९८ हजार ७६७.६० हेक्टर क्षेत्रापैकी ९३ हजार ४९४.०५ एवढ्या क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी व लागवड ९४ टक्के क्षेत्रावर झाली आहे. गेल्या आठवड्यापासून थंडीचे प्रमाण वाढल्याने या पिकांना पोषण वातावरण तयार झाले आहे. मात्र, थंडीचा उतार चढाव पिकांना घातक असल्याचे शिरूर तालुका कृषी अधिकारी एस. आर. ढवळे यांनी सांगितले.
ढगाळ वातावरण व धुके यामुळे या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे पहावयास मिळाले. पावसामुळे काही भागात ५० टक्के कांदा शेतातच सडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. काही भागात नव्याने कांदा लागवड सुरू झाली होती. सरासरी पेक्षा या रब्बी हंगामातील कांद्याची लागवड १५ हजार ५६२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी अवघे ४४ टक्के झाली आहे. गहू मात्र १२७ टक्के पेरणी केल्याचे आढळून आले आहे. हरभरा या पिकाची १०२ टक्के पेरणी झाली असून पिकांच्या उत्पादन घेण्याकडे शेतकरी पसंती दर्शविल्याचे दिसून येत आहे. बटाटा व टोमॅटो लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल हरभरा या पिकांकडे असल्याचा अंदाज आहे. किमान रात्रीचे तापमान दिवसागणिक दररोज कमी होत आहे. दररोज पहाटेला थंडीचे प्रमाण जाणवते. अनुकूल वातावरणात रब्बी हंगामात हरभरा पिकाला जोमाने फूल येत आहेत. आत्तापर्यंत शिरूर तालुक्यात ४ हजार ४२० हेक्टरवर हरभरा पेरणी झाली. गव्हासह इतर पिकाच्या तुलनेत हरभरा लागवड खर्च कमी येत असून कमी पाण्यातील हे पीक आहे. त्यामुळेच शेतकरी या पिकाला अधिक महत्त्व देताना दिसतात.

तालुक्यातील रब्बी हंगाम पीक पेरणीचा अहवाल ३१-१२-२०२१

पीक सरासरी क्षेत्र एकूण पेरणी केलेले क्षेत्र टक्केवारी

रब्बी ज्वारी ३२,८७३.०० १४५०६.०० ४४
गहू ४९२०.८० ६२४४.०० १२७
मका ५०२.८० ७१०.०० १४१
हरभरा ४३२७.०० ४४२०.०० १०२
वाल ०.०० ५७.६० ३८
तेलबिया २०.०० १.० २०
भाजीपाला, फुलपिके, चारापिके ३७५५५.०० ३८९३५.४५ १०४
एकूण ९८७६७.६० ९३४९४.०५ २८६


02682

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top