दौंडमध्ये तूर ५६०० रुपये क्विंटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमध्ये तूर ५६०० रुपये क्विंटल
दौंडमध्ये तूर ५६०० रुपये क्विंटल

दौंडमध्ये तूर ५६०० रुपये क्विंटल

sakal_logo
By

दौंड, ता. ५ : दौंड तालुक्यात तुरीची १५० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान ५००० रुपये; तर कमाल ५६०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात तुरीची ११७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल किमान ४८५० व कमाल ५५०० रुपये, असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भुसार माल व भाजीपाल्याची आवक आणि बाजारभावाची माहिती देण्यात आली. तालुक्यात दौंड येथील मुख्य बाजारासह केडगाव, पाटस व यवत येथील उपबाजारात लिलाव सुरू आहेत. दौंड मुख्य बाजारात फळे आणि पालेभाज्यांची आवक स्थिर असून, बाजारभावात वाढ आहे. केडगाव उपबाजारात गहू, ज्वारी व बाजरीची आवक स्थिर असून, बाजारभाव तेजीत होते. गवारीने एका आठवड्यानंतर पुन्हा शंभरी गाठली आहे. वांग्याचे बाजारभाव मात्र प्रतिकिलो शंभरवरून नव्वदवर आले आहेत.
फ्लॅावरची २८० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान ३००; तर कमाल ६०० रुपये, कोथिंबिरीस शेकडा किमान २०० रुपये, तर कमाल ४०० आणि मेथीस शेकडा किमान ८०० व कमाल १४०० रुपये, असा बाजारभाव मिळाला. लिंबाची १४५ डागांची आवक झाली असून, त्यास प्रतिडाग किमान ११०; तर कमाल ३७५ रुपये, असा बाजारभाव मिळाला.

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर रुपयांत) : टोमॅटो- ३००, वांगी- ९००, दोडका- ७००, भेंडी- ८००, कारली- ६५०, हिरवी मिरची- ६००, गवार- १०००, भोपळा- २००, काकडी- १५०, शिमला मिरची- ८००, कोबी- २५०.

शेतमालाची आवक (क्विंटल) व बाजारभाव (रुपये)
शेतमाल आवक किमान कमाल
कांदा ०९८७ ०८०० ३७००
गहू १२३४ १७५० २४००
ज्वारी ०१५७ १३०० २५००
बाजरी ०४३१ १७०० २४११
हरभरा ००२५ ३५०० ५०००
मका ००२४ १४०० १९५०

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top