दौंड तालुक्यात गव्हाची १ हजार ३२६ क्विंटल आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड तालुक्यात गव्हाची
१ हजार ३२६ क्विंटल आवक
दौंड तालुक्यात गव्हाची १ हजार ३२६ क्विंटल आवक

दौंड तालुक्यात गव्हाची १ हजार ३२६ क्विंटल आवक

sakal_logo
By

दौंड, ता. ३० : दौंड तालुक्यात गव्हाच्या आवक आणि बाजारभावात वाढ झाली आहे. गव्हाची १ हजार ३२६ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान १ हजार ८०० रुपये; तर कमाल २ हजार ५५१ रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात गव्हाची १ २४९ क्विंटल आवक होऊन त्यास किमान १८०० व कमाल २५०० रुपये असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भुसार माल व भाजीपाल्याची आवक आणि बाजारभावाची माहिती देण्यात आली. दौंड मुख्य बाजारात फळे आणि पालेभाज्यांची आवक स्थिर असून बाजारभाव तेजीत आहे. केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू व बाजरीची आवक स्थिर असून बाजारभाव तेजीत आहेत. केडगाव येथे कांद्याची ६७५० क्विंटल आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान ४०० रुपये; तर कमाल १३०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.

शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू.) कमाल (रू.)
ज्वारी ५८२ १८०० २३५०
बाजरी ३१६ १६५० २७००
तूर ०२९ ४५०० ५५००
हरभरा २०६ ४१०० ४५००
मका ००९ १८०० २३००


भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो - २००, वांगी - ३५० , दोडका - ३००, भेंडी - ४०० , कारली - ५००, हिरवी मिरची - ९००, गवार - ७००, भोपळा - ०७५, काकडी - १५०, शिमला मिरची - ४००, कोबी - ०८०.
फ्लॅावरची ८०० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान ५०; तर कमाल १५० रुपये, कोथिंबिरीस शेकडा किमान ३०० रुपये, तर कमाल ६०० आणि मेथीस शेकडा किमान २३०० व कमाल ८०० रुपये, असा बाजारभाव मिळाला. लिंबाची १७० डागांची आवक झाली असून त्यास प्रतिडाग किमान ७५१ तर कमाल २५०० असा बाजारभाव मिळाला.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..