वायरलेस फाटा येथील अपघातात तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायरलेस फाटा येथील अपघातात तरुणाचा मृत्यू
वायरलेस फाटा येथील अपघातात तरुणाचा मृत्यू

वायरलेस फाटा येथील अपघातात तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

दौंड , ता. २३ : दौंड - पाटस अष्टविनायक महामार्गावर वायरलेस फाटा येथे झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. सुनील ऊर्फ तुषार तुकाराम काळे (वय २५ , रा. हळगाव, ता. जामखेड, जि. नगर) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. २२ एप्रिल रोजी रात्री सुनील हा पुणे येथून दुचाकीवर त्याच्या आलेगाव (ता. दौंड) येथे राहणाऱ्या मामाकडे निघाला होता. रात्री आठ वाजता वायरलेस फाटा येथे एका राखाडी रंगाच्या मारुती एर्टिगाशी समोरासमोर झालेल्या धडकेत सुनील काळे याचा जागीच मृत्यू झाला. या बाबत सुनील काळे याचे मामा प्रकाश खोसे (रा. आलेगाव) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top