
विवाह सोहळ्यातील शिबीरात ६३ जणांचे रक्तदान
टाकळी हाजी, ता. २३ ः पिंपरखेड (ता. शिरूर) येथे विवाह सोहळ्यात रक्तदान शिबीराचे आयोजन करत वधूवरांनी सत्काराला फाटा देऊन रक्तदान करून सप्तपदीचे फेरे घेतले. या लग्न सोहळ्यात ६३ वऱ्हाडी रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सविंदणे (ता. शिरूर) येथील नितीन नरवेड व पिंपरखेड (ता. शिरूर) येथील माधुरी बोंबे या नवदांपत्याचा नुकताच पिंपरखेड येथे विवाह झाला. या सोहळ्यात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळीनी यावेळी रक्तदान केले. नवदांपत्याने लग्नाच्या अगोदर रक्तदान केल्यानंतर वरमाला घालण्यात आली. यावेळी त्यांनी भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालयाला ११ हजार रुपयांची देणगी दिली. सध्या रक्ताचा पुरवठा कमी झाला आहे. नितीन व माधुरीने विवाहात राबविलेला रक्तदान
शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव, पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे, माजी सरपंच दामू घोडे, संतोष मिंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..