onion
onionesakal

कोणी कांदा घेता का कांदा?

चाकण येथील महात्मा फुले बाजारामध्ये अवकाळीमुळे दोनशे टन कांदा भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. सडलेला कांदा विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली.
Summary

चाकण येथील महात्मा फुले बाजारामध्ये अवकाळीमुळे दोनशे टन कांदा भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. सडलेला कांदा विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली.

चाकण - येथील महात्मा फुले बाजारामध्ये अवकाळीमुळे दोनशे टन कांदा (Onion) भिजल्याने मोठे नुकसान (Loss) झाले आहे. सडलेला कांदा विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर (Merchant) आली आहे. नवा असलेला हा कांदा वाळवला तरीही तो सडत असल्याने त्यास प्रति किलो पाच रुपये बाजारभाव मिळत आहे, असे व्यापारी जमीरभाई काझी, प्रशांत गोरेपाटील, बाळू गायकवाड यांनी सांगितले.

बाजारात नव्या कांद्याची दहा हजार पिशवीची आवक झाली. प्रतवारीनुसार कांद्याला प्रति किलोस घाऊक बाजारात पाच ते सात व वीस रुपये भाव मिळत आहे, असे बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी सांगितले.

onion
पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा संप सुरू

आवक वाढली असली तरी सध्या बाजारात येणारा नवा कांदा टिकाऊ नसल्याने स्थानिक बाजारातच विक्री करावा लागत आहे. बाजारात अवकाळी पावसामुळे सुमारे दोनशे टन भिजलेला कांदा सडू लागल्याने दोन दिवस टिकणे देखील कठीण झाले आहे. चाकण बाजारात पुढील आठवड्यापासून आणखी आवक वाढणार आहे. नव्याने येत असलेला चांगल्या प्रतीचा निवडक कांदा देशांतर्गत बाजारातच विकला जात आहे.

भिजलेला कांद्यास बाजारात मागणी नसल्याने तो प्रतिकिलोला ५ ते १० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. सडलेल्या कांद्याची एक पिशवी अवघ्या पन्नास रुपयांत मेंढ्यांना खाण्यासाठी मेंढपाळांना विकली जाते.

- विनायक घुमटकर, सभापती, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com