प्रदीप कंद यांची
पतसंस्थेला भेट

प्रदीप कंद यांची पतसंस्थेला भेट

केसनंद, ता. ८ : जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदिप कंद यांनी पेरणेफाटा (ता. हवेली) येथील हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेला सदिच्छा भेट देत नागरी सहकारी पतसंस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, त्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाहीही दिली. याप्रसंगी सोरतापवाडीचे माजी सरपंच सागर चौधरी, पतसंस्थेच्या अध्यक्षा पुनम चौधरी यांच्यासह संचालकांशीही संवाद साधत पतसंस्थेच्या विविध अडचणीबाबत चर्चा करत त्यावर मार्ग काढण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष जयवंतराव चौधरी, संचालक अविनाश जगताप, दिनकर गव्हाणे, पांडुरंग खेडेकर, विठ्ठल चौधरी, अमोल चौधरी, तानाजी चौधरी, शिवाजी केसकर, रेश्मा चौधरी, संभाजी वाळके, गोरख चौधरी, रघुनाथ चौधरी, रामदास कुंजीर, ज्ञानेश्वर जवळकर, सल्लागार नितीन गव्हाणे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com