पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभापतीपदी कुंजीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभापतीपदी कुंजीर
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभापतीपदी कुंजीर

पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभापतीपदी कुंजीर

sakal_logo
By

सासवड शहर, ता. १ : येथील पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीमध्ये सभापतीपदासाठी वैजयंता कुंजीर, उपसभापतीपदासाठी गोरक्षनाथ चव्हाण तर मानद सचिवपदासाठी सुधीर मेमाणे यांचा एकच अर्ज दाखल झाल्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी सुनील जगताप यांनी जाहीर केले.
यावेळी संचालक राजेद्र कुंजीर, चंद्रकांत जगताप, अनंता जाधव, दत्तात्रेय फडतरे, शरद पवार, संतोष कुंजीर आदी उपस्थित होते. पुरंदर पंचायत समितीच्या सदस्य सुनीता कोलते, पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती ॲड. गौरी कुंजीर, वाघापूरच्या सरपंच रेवती कुंजीर, शिवसेना नेते ॲड. नितीन कुंजीर, नवनिर्वाचित उपसभापती गोरक्षनाथ चव्हाण, मानद सचिव सुधीर मेमाणे, गोरख मेमाणे, अरुण महाडीक तसेच परिवर्तन पॅनेलचे प्रमुख राजेंद्र जगताप, तानाजी फडतरे व प्रदीप कुंजीर यांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन बाळासाहेब फडतरे यांनी केले. आभार धनंजय जगताप यांनी मानले.

वैजयंता कुंजीर, गोरक्षनाथ चव्हाण, सुधीर मेमाणे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top