
चांगावटेश्र्वर मंदिरामधील पिंडीला फुलांची सजावट
सासवड शहर, ता. १ : सासवड- नारायणपूर रस्त्यावर पुरातन हेमाडपंती वटेश्वर मंदिरात महाशिवरात्र निमित्ताने रात्री बारा वाजता प्रथम प्रहरी चांगावटेश्वर सुधार समिती यांचे वतीने रुद्र अभिषेक करण्यात आला. त्याचे अक्षय बेलसरे यांनी पौरोहित्य केले. यावेळी पिंडीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
यावेळी सुधार समितीचे सभासद प्रसाद जगताप, धनंजय गाडेकर, परशुराम देशमुख, सोमनाथ शिळीमकर, शुभांगी न्हालवे, डॉ. माईनकर, अँड. स्नेहल कामथे व इतर सभासद उपस्थित होते. त्यानंतर सासवड ग्रामस्थांनी अभिषेक व दर्शन घेतले.
महाशिवरात्र निमित्ताने हरीनाम सप्ताहाचे आयोजन हरी बुवा शिंदे महाराज यांनी केले आहे. सायंकाळी सहा वाजता महाआरतीचे आयोजन सासवडमधील मंदिरात दररोज नित्यनेमाने सायंपूजा करणारे बाळासाहेब चव्हाण यांनी केले. ॲड. श्रीकांत सूर्यवंशी यांनी प्रसाद वाटप केला. दिवसभर हडपसर येथील शिव भक्त अमोल हिंगणे परिवार यांचे वतीने येणाऱ्या भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. रात्री बारा वाजता देवस्थानचे मालक सरदार जयसाहेब पुरंदरे यांचे परिवार वतीने भालचंद्र शालीग्राम हे रुद्र अभिषेक करणार आहेत.
कोरोनाच्या संदर्भातील निर्बंध शिथिल केले नसल्याने या वर्षी होणारा भंडारा रद्द करण्यात आल्याचे सुधार समिती प्रमुख अँड. नितीन जाधव यांनी सांगितले.
....................
04623