विद्यार्थी, महिलांविषयीच्या कायद्यांचे गावडेवाडीत पोलिसांकडून मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी, महिलांविषयीच्या कायद्यांचे गावडेवाडीत पोलिसांकडून मार्गदर्शन
विद्यार्थी, महिलांविषयीच्या कायद्यांचे गावडेवाडीत पोलिसांकडून मार्गदर्शन

विद्यार्थी, महिलांविषयीच्या कायद्यांचे गावडेवाडीत पोलिसांकडून मार्गदर्शन

sakal_logo
By

मंचर, ता. ५ : आदर्श गाव गावडेवाडी (ता.आंबेगाव) येथील हिरकणी विद्यालयाच्या मैदानात मंगळवारी (ता.४) महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन सप्ताहानिमित्त पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पोलिस दल बँड पथकाने देश भक्तीपर गीत वाजवून साजरा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी विद्यार्थिनी व महिला संदर्भात असलेले कायदे, त्यातील शिक्षेची तरतूद यासंदर्भात जनजागृती व मार्गदर्शन केले.
संरपंच स्वरूपा ऋषीकेश गावडे, माजी सरपंच मनीषा गावडे, संतोष गावडे, मुख्याध्यापक विनोद बोंबले यांनी पोलिस दल बँड पथकाचे स्वागत केले. पोलिस उपनिरीक्षक रूपाली पवार, पोलिस उपनिरीक्षक सोमेश्र्वर शेटे यांनी भारतीय दंडविधान कायदे मुंबई पोलिस अधिनियम व इतर कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
मंचर पोलिस ठाण्याचे गणपत डावखर, राजेश नलावडे, सोमेशवर वाफगावकर, मोनिका राक्षे आदी वर्धापन दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. कोरोना योद्धा पुरस्कार देऊन अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापिका एस. बी. लोंढे व पुणे ग्रामीण बँड पथकाचे सहायक फौजदार एस. बी काळे यांनी व्यवस्था पाहिली.

04661

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top