शिवनेरी जम्बो सेंटरला ५४ लाख रुपये निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवनेरी जम्बो सेंटरला ५४ लाख रुपये निधी
शिवनेरी जम्बो सेंटरला ५४ लाख रुपये निधी

शिवनेरी जम्बो सेंटरला ५४ लाख रुपये निधी

sakal_logo
By

मंचर ः ‘‘अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शिवनेरी जम्बो कोविड सेंटर व तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कोविड सेंटरला पुणे जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून तीन महिन्यासाठी एकूण ५४ लाख रुपये निधी दिला जाईल.” अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी दिली.’’
यासंदर्भात आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती संजय गवारी म्हणाले, “घोडेगाव येथे शुक्रवारी (ता.१४) काकडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेडगे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कोविड उपचार तातडीने मिळण्यासाठी उपाय योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेचा निधी मिळाल्यानंतर अवसरी खुर्दची दोन्ही कोविड सेंटर सुरु होतील. उपजिल्हा रुग्णालयातील कामकाज पूर्वी प्रमाणेच कोविड सोडून अन्य सर्व रुग्णांसाठी खुले होईल.”

रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध देणार
“राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यात कोविड निवारणासाठी गेली दोन वर्ष प्रशासन व संस्थांनी काम केले आहे. तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.” अशी माहिती शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली.
ते म्हणाले, “भीमाशंकर साखर कारखाना, शरद बँक व पराग मिल्क फूड्स यांच्यावतीने विलगीकरण कक्षातील रुग्णांना औषधे, डॉक्टर, परिचारिका यांचे मानधन देण्यात येईल.”
“मंचर उपजिल्हा रुग्णालयातील व अवसरीतील कोविड रुग्णांना, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पौष्टिक नाश्ता, हळदयुक्त दूध देवेंद्र शहा फौंडेशनच्या वतीने दिले जाईल. सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पुढाकार घ्यावा.” असे आवाहन शहा यांनी केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top