पेठ पाणी योजनेसाठी भाजपचेही योगदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठ पाणी योजनेसाठी भाजपचेही योगदान
पेठ पाणी योजनेसाठी भाजपचेही योगदान

पेठ पाणी योजनेसाठी भाजपचेही योगदान

sakal_logo
By

मंचर, ता. ३१ : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागाला वरदान ठरणाऱ्या पेठ प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेमध्ये भांडणे सुरू असतानाच त्यामध्ये सोमवारी (ता. ३१) भाजपने उडी घेतली आहे.
पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन व बबनराव लोणीकर यांचेही पाणी पुरवठा योजना मंजुरी योगदान होते, असा दावा मंचर (ता. आंबेगाव) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी आंबेगाव तालुका भाजपचे सरचिटणीस संदीप बाणखेले, भाजप पदवीधर आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रा. उत्तम राक्षे, किरण कांबळे उपस्थित होते.
थोरात म्हणाले, ‘‘मुंबई येथे सन २०१८ मध्ये अशोकराव टाव्हरे यांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले होते. आमदार मेघा बोर्डीकर-साकोरे यांनी महाजन, लोणीकर व सातगाव पठारचे ग्रामस्थांची बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. नळ योजना मंजुरीची प्रक्रिया त्यावेळी सुरू झाली होती. नळ योजना मंजूर झाल्याचा आनंद झाला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर यांनाही श्रेय आहेच. पण, भाजपचाही उल्लेख होणे अपेक्षित होते.’’

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भीमाशंकर साखर कारखान्याने राज्य व देश पातळीवर नावलौकिक निर्माण केला आहे. पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. विनाकारण कारखान्याचा खर्च होता कामा नये. विरोधासाठी विरोध ही भाजपची भूमिका नाही. कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपही पुढाकार घेईल.
- संजय थोरात, अध्यक्ष, पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चा

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top