मंचरला सोमवारपर्यंत कमी दाबाने पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरला सोमवारपर्यंत कमी दाबाने पाणी
मंचरला सोमवारपर्यंत कमी दाबाने पाणी

मंचरला सोमवारपर्यंत कमी दाबाने पाणी

sakal_logo
By

मंचर, ता. ८ : येथे जीवन प्राधिकरणामार्फत जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवार (ता. ११)पर्यंत मंचर शहराला कमी दाबाने व कमी काळासाठी पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी केले आहे.

दरम्यान, पष्टे यांनी सुलतानपूर येथील पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यांची व पाइपलाइनची पाहणी केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘पाण्याची गळती होत आहे. लोखंडी पाइपलाइनला काही ठिकाणी चिरा पडल्या आहेत. त्यामुळे पाण्याची टाकी भरण्यासाठी विलंब होत आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपंचायतीच्यावतीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शुक्रवार (ता. ८)पासून दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.’’

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top