तीसपेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईतास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीसपेक्षा जास्त घरफोडीचे 
गुन्हे करणाऱ्या सराईतास अटक
तीसपेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईतास अटक

तीसपेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईतास अटक

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. ६ : लोणी काळभोर परिसरासह शहर व जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीसपेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे केलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चारचाकी वाहन व रक्कम रक्कम, असा एकूण ३१ लाख ७४ हजार ८६० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी (वय ४४, रा. मांजरी बुद्रूक, ता. हवेली), असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने ३० घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधानी हा रामटेकडी, हडपसर येथे येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होत. त्यानंतर सापळा रचून दुधानी याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. माने, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, पोलिस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंद, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top