बलदोटा, रोमन यांची राज्यस्तरीय स्पर्धेत अंतिम फेरीत निवड-PNE21R0460 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलदोटा, रोमन यांची राज्यस्तरीय स्पर्धेत अंतिम फेरीत निवड-PNE21R0460
बलदोटा, रोमन यांची राज्यस्तरीय स्पर्धेत अंतिम फेरीत निवड-PNE21R0460

बलदोटा, रोमन यांची राज्यस्तरीय स्पर्धेत अंतिम फेरीत निवड-PNE21R0460

sakal_logo
By

इंदापूर, ता. २५ ः विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनी पलक विलास बलदोटा व संजीवनी शंकर रोमन यांची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्या ज्योती जगताप यांनी दिली.
महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड तसेच इतर सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन ‘महिला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम कशा बनू शकतात?’ या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये दोन्ही विद्यार्थिनींनी अंतिम फेरीत धडक मारल्याने शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
दरम्यान, कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड म्हणाले, या वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण राज्यातील विद्यार्थी सहभागी झाली असून अंतिम स्पर्धेची तयारी सुरू आहे. यासंदर्भात कोरोना स्थिती पाहून योग्य वेळी घोषणा केली जाईल.


30672
30673

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top