म्हाडातील भरतीसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर

म्हाडातील भरतीसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर

पुणे, ता. १ : म्हाडामध्ये विविध पदांच्या भरतीसाठीचे परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर झाले आहे. त्यानुसार २९, ३० आणि ३१ जानेवारी आणि १ ते ३ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे.
परीक्षेच्या आदल्या रात्री पेपर फुटीचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे १२ डिसेंबर २०२१ रोजी होणारी परीक्षा रद्द करण्याची वेळ म्हाडावर आली होती. त्यानंतर ही परीक्षा जानेवारीमध्ये घेणार असल्याचे त्याच वेळी जाहीर करण्यात आले होते. त्‍यानुसार वेळापत्रक जाहीर केल्याने परीक्षार्थ्‍यांनी स्वागत केले आहे.
म्हाडाच्या विविध विभागातील १४४ पदांसाठी ५६५ रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. या परीक्षेसाठी दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षा काही तासांवर असताना अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री दोन वाजता परीक्षा पुढे ढकलली असल्याची माहिती ट्वीटवर दिली होती. तसेच व्हिडिओ माध्यमातून परीक्षार्थींची माफी मागितली होती. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून टीसीएस कंपनी घेणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com