वाल्हे येथे वक्तृत्व, हस्ताक्षर स्पर्धा

वाल्हे येथे वक्तृत्व, हस्ताक्षर स्पर्धा

वाल्हे, ता. ३ : माझी माय सावित्री होती लय हो धीराची, लेकीबाळी शिकवाया पर्वा केली ना घराची, सदा धन्याच्या पाठीशी उभी पदर खोचून, किती केलं रे सहन, कधी गेली ना खचून, तिनं घडविली क्रांती. यांसह विविध कविता गीते सादर करत वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच बालिकादिन साजरा करण्यात आला.
वाल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या आदर्श ८९ फाउंडेशनचे संस्थापक व ऑस्ट्रेलिया येथील अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉ. नीलेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध, वक्तृत्व, चित्रकला, हस्ताक्षर आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्या प्रीती वाघमारे व दीपाली कुदळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी आशा भुजबळ, कल्पना राऊत, हेमलता जाधव, सरोजिनी कारंडे, वर्षा जाधव, ऊर्मिला आतकरी, सुजाता भुजबळ आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे ः निबंधस्पर्धा- आस्था किशोर कुदळे (प्रथम), सोहम मंगेश कुंभार (द्वितीय), विवेक संतोष भुजबळ (तृतीय).
हस्ताक्षर स्पर्धा- संध्या पंढरीनाथ बामणे (प्रथम), ईश्वरी हनुमंत आतकरी(द्वितीय), देऊ संजय गायकवाड (तृतीय). चित्रकला स्पर्धा- प्रथमेश अमोल गार्डी (प्रथम), सई नरेश पवार (द्वितीय), धनराज गुणवंत राऊत (तृतीय). वक्तृत्व स्पर्धा- जान्हवी नीलेश वाघमारे(प्रथम), प्राची प्रकाश चव्हाण (द्वितीय), सुमेध सुशांत पवार (तृतीय).
सहशिक्षिका अस्मिता भागवत, कीर्ती लिपारे, मीनल खोडके यांनी संयोजन केले. मुख्याध्यापिका पद्मा माळवदकर यांनी प्रास्ताविक केले. लालासाहेब खुडे यांनी आभार मानले.
माळवाडी (ता. पुरंदर) येथे अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने अंगणवाडीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुनीता भुजबळ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी वकृत्व, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.याप्रसंगी विलास दुर्गाडे, गणेश म्हेत्रे, सुनीता भुजबळ, पोर्णिमा तांदळे, रेश्मा भुजबळ, प्रिया भुजबळ, सुजाता गायकवाड, संध्या पवार, ज्योती दुर्गाडे, निर्मला भुजबळ, कोमल पवार आदी उपस्थित होते.
अंगणवाडी पर्यवेक्षिका अनिता भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. अंगणवाडी सेविका सारिका भोसले व छाया भुजबळ यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com