करडे येथे शिक्षक योगेश बांदल यांचा सन्मान

करडे येथे शिक्षक योगेश बांदल यांचा सन्मान

गुनाट, ता. ६ : ‘‘शिक्षक हा आयुष्यभर दात्याच्या भूमिका निभावतो. आपल्याकडील ज्ञानाने देशाची, समाजाची भावी पिढी घडवण्यासाठी तो शेवटच्या क्षणापर्यंत झटतो, म्हणूनच शिक्षक कधीच रिटायर्ड होत नसतो,’’ असे प्रतिपादन शिरूर प्राथमिक शिक्षक संघाचे पुणे जिल्ह्याचे विभागीय अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी केले. करडे (ता. शिरूर) येथे शिक्षक योगेश बांदल यांचा सेवानिवृत्तीनिनिमित्त सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तालुकाध्यक्ष संतोष थोपटे, पंचायत समितीच्या उपसभापती मंगल लंघे, आदर्श सरपंच संतोष लंघे, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण वाळके, भाऊसाहेब पळसकर, दत्तात्रेय देशमुख, सतीश पाचर्णे, अजय जगदाळे आदी उपस्थित होते.
PNE22S33308

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com