पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन

पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन

वाल्हे, ता. ६ : ‘‘पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या सकारात्मक घटनांवर आधारित पत्रकारिता करावी व विकसित समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
वाल्हे (ता. पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये गुरुवारी (ता. ६) पत्रकार दिनानिमित्त दुर्गाडे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किशोर कुदळे, सिकंदर नदाफ, महावीर भुजबळ, समीर भुजबळ, विजय पवार, गोरख मेमाणे आदी पत्रकारांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अॅड. विजय भालेराव, दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, सुनील पवार, हनुमंत पवार, विक्रम फाळके, अभिषेक दुर्गाडे, बंटी भुजबळ, अमोल कदम आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये दुर्गाडे हे उच्चांकी मतांनी निवडून आल्याबद्दल. तसेच स्वाती दुर्गाडे यांनी शिक्षणशास्त्रात पीएच.डी. मिळविल्याबद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य मोहन वाघमारे यांनी प्रास्ताविक; तर पी. बी. जगताप यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार यांनी आभार मानले.
वाल्हे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अमोल खवले व माजी सरपंच दत्तात्रेय पवार यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी समदास भुजबळ, सूर्यकांत भुजबळ, राणी भुजबळ, डॉ. रोहिदास पवार, त्रिंबक भुजबळ, संतोष भुजबळ, दादासाहेब म्हेत्रे, जयवंत भुजबळ, दादासाहेब मदने आदी उपस्थित होते. दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले.

PNE22S33515

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com