
शिर्सुफळमधील घरफोडीत दोन लाखांचे दागिने लंपास
बारामती, ता. ३१ : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील रामा महादेव हिवरकर यांचे घर फोडून जवळपास दोन लाखांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. याबाबत त्यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी व त्यांचा भाऊ महेश हे एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरी करतात. फिर्यादी २९ जानेवारी रोजी संध्याकाळीकामावरून घरी आले. भाऊ महेश यांना ओव्हर टाइम करावा लागल्याने ते कंपनीत थांबले. ३० जानेवारी रोजी सकाळी महेश यांच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आतमध्ये जात पाहणी केली असता कपाट उघडे असल्याचे दिसून आले. त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. घरातील साहित्याची पाहणी केली असता कपाटामध्ये ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यात दीड तोळे वजनाचे प्रत्येकी ७४ हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे गंठण, २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स, १५ हजार रुपयांची नथ, ५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने, लहान मुलांच्या हातातील चांदीच्या बिंदल्या, असा १ लाख ९४ हजारांचा माल चोरीला गेला.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..