महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा बारामतीत नागरिकांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा बारामतीत नागरिकांना फटका
महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा बारामतीत नागरिकांना फटका

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा बारामतीत नागरिकांना फटका

sakal_logo
By

बारामती, ता. ८ ः गेल्या पाच दिवसांपासून बारामतीच्या प्रशासकीय इमारतीतील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाचे कामकाज ठप्प आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा फटका ग्रामीण भागातील लोकांना बसत आहे.

महसूल विभागातील वरिष्ठ लिपिक व मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती देण्यात यावी, महसूल विभागातील रिक्त पदे भरावीत यासह इतरही विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. रिक्त पदांची भरती न केल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या बारामती शाखेचे अध्यक्ष महसूल सहायक मधुकर जाधव यांनीही मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु राहील, असे सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top