तळागाळातील माणुस स्वत:च्या पायावर उभा राहावा

तळागाळातील माणुस स्वत:च्या पायावर उभा राहावा

चास, ता. १३ : सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या भरपूर योजना आहेत, त्यांचा लाभ लाभार्थींनी घेतला पाहिजे. शास्वत विकास गरजेचा असून तळागाळातील माणुस स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत असे स्पष्ट मत खेड पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी यांनी कान्हेवाडी बुद्रुक (ता. खेड) येथील ठाकरवस्तीत व्यक्त केले.
राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत महाआवास अभियानामध्ये कान्हेवाडीच्या ठाकरवाडीतील नऊ कुटुंबांना घरकुल मंजूर झाले असून या लाभार्थींना मंजुरीचे आदेश व घरकुलांचे भूमिपूजन कार्यक्रमाचे मंगळवार (ता. ११) रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती अरुण चौधरी होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, माजी सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, विस्तार अधिकारी अनिता ससाणे, गावचे सरपंच बी. डी. कोबल, उपसरपंच सुखदेव पारधी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र थोरात, रूपाली पारधी, प्रियांका वाव्हळ, शिवमंगल आंबेकर, संजय घुमटकर, शंकर बुरसे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी अनिता ससाणे यांनी लाभार्थींना मिळणाऱ्या विविध योजनांसह घरकुलाबाबत काय करायचे याचे मार्गदर्शन केले. तर गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी नरेगा, शौचालय योजना, सौभाग्य योजना, उज्ज्वला योजना या विषयी माहिती दिली. अंकुश राक्षे यांनी पंचायत समीतीच्या विविध योजना, जलजिवन, कृषीच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बाळू केदारी, शांताराम पारधी, शंकर केदारी, मंदा केदारी, तान्हाजी पारधी, बाळशिराम पारधी, शिवाजी पारधी, सीमा कोबल, कमल कोबल यांना मंजुरीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटीचे माजी अध्यक्ष महेंद्र थोरात यांनी केले तर आभार सरपंच बी. डी. कोबल यांनी मानले.

CHS12 P1

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com