भोरमधील शाळेला सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरमधील शाळेला सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन
भोरमधील शाळेला सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन

भोरमधील शाळेला सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन

sakal_logo
By

भोर, ता. १४ : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील मुलींसाठी जेजुरी देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सॉलिसीटर प्रसाद शिंदे, भोरमधील रोबोकॉब कॉम्प्युटर्स आणि टिटेघर (ता. भोर) येथील ध्रुव प्रतिष्ठानमार्फत मोफत सॅनिटरी पॅड वेंडींग मशिन देण्यात आले.
येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनानिमित्त हे मशिन विद्यालयाकडे हस्तांतरित केले. सॉलिसीटर प्रसाद शिंदे, प्रा. विजय जाधव आणि ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांच्या हस्ते वेंडींग मशिन गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उषा कदम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. गर्ल्स हायस्कूलमधील मुलींचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड मिळावेत अशी विनंती मुख्याध्यापकांनी भोरमधील इको फ्रेंडली सॅनिटरी पॅडचे उत्पादन करणाऱ्या प्रा. दीपाली जाधव यांच्याकडे केली. जाधव यांच्या प्रयत्नामुळे सॉलिसीटर शिंदे, प्रा. विजय जाधव व केळकर यांनी एक वर्षांच्या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून दिला. विद्यालयातील सुमारे २५० मुलींना इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध होणार आहे. ध्रुव प्रतिष्ठानमार्फत विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक शिबिरे घेऊन मोफत औषधे देणार असल्याचे राजीव केळकर यांनी सांगितले. यावेळी शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब वाघ, प्रा. संभाजी सरवदे, प्रा. रवींद्र भालेराव, गर्ल्स हायस्कूलचे पर्यवेक्षक बाळासाहेब ताडे, मालूसिंग मावची, दत्तात्रेय बढे, स्वाती मिरजे, स्नेहल डाळ, वंदना कुंभार व वृषाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब ताडे यांनी सूत्रसंचालन केले तर वंदना कुंभार यांनी आभार मानले.
११९१२
kik14p1-girls-machine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top