विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती उत्तीर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती उत्तीर्ण
विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती उत्तीर्ण

विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती उत्तीर्ण

sakal_logo
By

शिरूर, ता. ३१ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत येथील विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थ्यांनी, पूर्ण जिल्ह्यात अव्वल कामगिरी केली. या परीक्षेच्या शहरी विभागाच्या गुणवत्ता यादीत प्रशालेचे तब्बल ३५ विद्यार्थी झळकले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेतील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखताना, पूर्व उच्च प्राथमिक मध्ये श्रेयस चव्हाण याने राज्याच्या गुणवत्ता यादीत आठवा; तर नील सोनवणे याने नववा क्रमांक पटकावला. श्रेयस याला २७८; तर नील याला २७६ गुण मिळाले असल्याची माहिती मुख्याध्यापक योगेश जैन यांनी दिली. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होणारी ही परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सहा महिने उशिराने झाली. या स्थितीत प्रशालेने विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाईन प्रशिक्षण दिले; तसेच, मार्गदर्शक शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन व नियोजन केल्याने या परीक्षेत पाचवीचे २३ व आठवीचे १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकले, असे त्यांनी सांगितले.
पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) परीक्षेतील शिष्यवृत्तिधारक विद्यार्थी व कंसात त्यांचे गुण पुढीलप्रमाणे : श्रेयस चव्हाण (२७८), नील सोनवणे (२७६), श्‍लोक साबळे (२६८), भक्ती कोहकडे (२६२), ऋतुजा होलगुंडे (२५४) विराज बोरकर (२५०), शंभूराजे पाचर्णे व तनिष्का पवार (दोघांना २४६), स्नेहा आटोळे व मृणाल खामकर (२४०), परीजा मगर (२३६), नित्या तळप (२२८), यशश्री मुळे (२२६) तेजल जगदाळे (२२०), विश्‍वजित जंजिरे (२१८), आर्यन कोकाटे (२१४), प्रणव कोकाटे (२१०), स्नेहा झरेकर (२०८), सुमीत भळगट (२०६), सिद्धी गुंड व सिद्धी मोहिते (दोघींना २०४), श्रुती कुरंदळे व सर्वज्ञ कडेकर (प्रत्येकी २०२). पूर्व माध्यमिक (आठवी) परीक्षेतील शिष्यवृत्तिधारक विद्यार्थी व कंसात त्यांना मिळालेले गुण पुढीलप्रमाणे ः प्रणव पोटघन (२२६), संग्राम शेवाळे (२२०), अथर्व थोपटे (२१२), अभिजित कुताळ (२१०), आदिती लाळगे (२०४), श्रीराज जाधव (२०२), वेदांत धुमाळ (१९८), संस्कृती थोरात, सुदर्शन खोडदे व स्मृती भंडारे (१९६), तृष्णा वाटेकर (१९२), सोहम ईश्‍वरे (१९०). या गुणवंत विद्यार्थ्यांना हरिभाऊ भुसारे, मयूरी नगरे, शहाजी सालके, साजिद तांबोळी, सोनाली सोनवणे, स्वाती घुमरे, सीमा गवळी, गोपाल कुल, सागर पारधे, सोनाली मिरजकर, मंगल भालेकर, रेखा विधाटे, विवेकानंद क्षीरसागर, सुभाष चौधरी, संदीप करंजुले आदींनी मार्गदर्शन केले. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा व सचिव नंदकुमार निकम यांनी या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top