कोंडी सोडण्यासाठी चाकणला वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडी सोडण्यासाठी चाकणला वाहतुकीत बदल
कोंडी सोडण्यासाठी चाकणला वाहतुकीत बदल

कोंडी सोडण्यासाठी चाकणला वाहतुकीत बदल

sakal_logo
By

चाकण, ता. १३ ः येथील पुणे-नाशिक महामार्गावरील तसेच तळेगाव- चाकण-शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी चाकण-शिक्रापूर मार्गावरील शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येणारी सर्व प्रकारची वाहने तळेगाव, मुंबर्ईकडे जाण्यासाठी माणिक चौकातून जुन्या पुणे मार्गाने उद्या (ता. १४)पासून जातील, असा आदेश वाहतूक विभागाने काढला आहे. त्यानुसार वाहतुकीत बदल केला असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली.
दरम्यान वाहतूक विभागाचे अधिकारी, तालुक्याचे लोकप्रतिनिधी, इतर पदाधिकारी यांच्या सहकार्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवा पॅटर्न राबविण्यात येत आहे. चाकण (ता. खेड) येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग (क्र. ६०) तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी) या मार्गावरून चाकण, शिरूर, मावळ या औद्योगिक वसाहतीतील मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची तसेच पुणे, नाशिक, नगर, मराठवाडा भागात जाणाऱ्या मालवाहू व इतर प्रवाशी वाहनांची मोठी वाहतूक असते. या वाहतुकीमुळे दोन्ही महामार्गावर कोंडी सातत्याने होते. कोंडीमुळे नागरिक, वाहनचालक हैराण झाले आहेत. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी खेडचे आमदार दिलीप मोहीते यांच्या मार्गदर्शनानुसार व सहकार्याने वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.
याबाबत उपायुक्त भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येणारी सर्व वाहने तळेगाव, मुंबईकडे जाण्यासाठी माणिक चौकातून डाव्या बाजूने जुन्या पुणे मार्गाने वळवून मुटकेवाडी चौक- बंगलावस्ती-आळंदीफाटा-स्पायसरचौक-निघोजे डोंगरवस्ती-इन्डुरन्स चौक-एचपी चौक मार्गे तळेगाव, मुंबईला जातील. तसेच पुण्यासाठी जाणारी वाहने सुद्धा माणिकचौक-मुटकेवाडी चौक-बंगलावस्ती-आळंदी फाटा-स्पायसरचौक- मोशीमार्गे पुण्याला जातील. मुटकेवाडीकडून ओढ्याच्या बाजूच्या रस्त्याने माणिक चौकाकडे जाण्यास सर्व वाहनांना बंदी करण्यात येत आहे. चाकणकडे येण्यासाठी मुटकेवाडीकडून येणाऱ्या सर्व वाहनांनी पुणे- नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी भुयारी मार्गाचा वापर करावा असे आदेशात म्हटले आहे. वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून सर्व नागरिकांनी या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चौरे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top