कान्हेवाडी बुद्रुकमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कान्हेवाडी बुद्रुकमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सव
कान्हेवाडी बुद्रुकमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सव

कान्हेवाडी बुद्रुकमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सव

sakal_logo
By

चास, ता.२० : कान्हेवाडी बुद्रुक (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री प्रतिष्ठान व अस्तित्व कला मंचाने स्ट्रॉबेरी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात गावच्या मुख्य तसेच वाडीवस्तीतील भागशाळेचे पंचाऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते. स्ट्रॉबेरीच्या ढीगातील स्वतःच्या हाताने हवे तेवढी फळे घेऊन खाण्याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले होते.
पहिल्यांदाच आपल्या दोन्हीही हातात बसेल इतकी स्ट्रॉबेरी घेऊन खाताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अनोखा आनंद पसरला होता. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सण समारंभाच्या निमित्ताने नेहमी ग्रामस्थ किंवा पाहुण्यांकडून चॉकलेट, बिस्कीट किंवा इतर फळे असा खाऊ मिळत असतो. आज मिळालेला खाऊ मुलांचे कुतूहल जागृत करणारा होता. स्ट्रॉबेरीचे पीक थंड हवेच्या ठिकाणी घेतले जाते, हे पुस्तकात वाचलेले किंवा शिक्षकांनी शिकवलेले विद्यार्थ्यांना थोडेबहुत माहीत होते. मात्र प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी मनसोक्त खायलाही मिळाली. सह्याद्री प्रतिष्ठानचा हा उपक्रम नावीन्यपूर्ण आहे, अशी भावना मुख्याध्यापक सुरेश नाईकरे व शंकर बुरसे यांनी यावेळी व्यक्त केली.
सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल म्हणाले कि, प्रतिष्ठान वेळोवेळी गावातील शालेय विद्यार्थ्यांसह इतरही घटकांसाठी विविध उपक्रम राबवीत असते. कोरोना काळात प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून गावातील गरजू कुटुंबांना एक महिन्याचा किराणा उपलब्ध करून दिला होता. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गेली दोन वर्षात उपक्रम राबविता आला नव्हता. एक अनोखा उपक्रम म्हणून स्ट्रॉबेरी महोत्सव भरवून विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला आहे. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते योगेश खाडे, पिंटू पवार, सुजित थोरात, विलास कोबल, विनोद कोबल, कला मंचाच्या प्रमुख डॉ. अश्विनी शेंडे, योगेश गोंधळे, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी सोमनाथ शिंदे यांनी या महोत्सवाचे संयोजन केले.
--------------------------------------------------------------------------
44496

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top