खंडोबा घोलप यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडोबा घोलप यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार
खंडोबा घोलप यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

खंडोबा घोलप यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

sakal_logo
By

भोर, ता. ७ : अंबाडे (ता. भोर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपशिक्षक खंडोबा शंकर घोलप यांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सन २०१९-२० या वर्षांतील शैक्षणीक गुणवत्ता व विकास कार्यक्रमाअंतर्गत या जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खंडोबा घोलप यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कमलाकर रणदिवे, भोरचे सभापती लहू शेलार उपस्थित होते. घोलप शिक्षण विभागात १७ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सन २००८ मध्ये पंचायतीमार्फत तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
झाला आहे. राज्य शासनाच्या इंस्पायर अॅवार्ड योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून त्यांच्या प्रकल्पाची राज्यस्तरीय प्रदर्शनात निवड झाली आहे. कोविडच्या काळात त्यांनी गावात जनजागृती, गृहभेटी, लसीकरण मोहीम आदी कार्यक्रम राबविले.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top