भोरमधील मेळाव्याचा १७६८ रुग्णांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरमधील मेळाव्याचा १७६८ रुग्णांना लाभ
भोरमधील मेळाव्याचा १७६८ रुग्णांना लाभ

भोरमधील मेळाव्याचा १७६८ रुग्णांना लाभ

sakal_logo
By

भोर, ता. २४ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या आरोग्य मेळाव्याचा १ हजार ७६८ जणांना लाभ
मिळाला. मेळाव्यात ४०६ जणांची डोळे तपासणी करण्यात आली तर १७ मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आल्या.
  आरोग्य मेळाव्याचे उदघाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत साबणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक संतोष देशपांडे, बालरोगतज्ञ डॉ. लक्ष्मण लाटणे, ध्रुव प्रतिष्ठानचे राजीव केळकर, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर, गटनेते सचिन हर्णसकर, नगरसेवक अमित सागळे, सुमंत शेटे, गणेश पवार, दीपक अंबोरे, प्रज्ञा कदम, जगदीश किरवे, समीर घोडेकर आदी उपस्थित होते.
शिबीरात अस्थिरोग, बालरोग, सोनोग्राफी व एक्स-रे या सुविधा मोफत पुरवण्यात आल्या. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २० बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले.यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कार्डचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील आरोग्य विभागाचे २० वैद्यकीय अधिकारी आणि शंभरपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी तपासण्या पूर्ण केल्या. संजय देवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

PNE22S59332

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top